आपल खान्देश

सकल धनगर समाज चाळीसगाव तालुका समन्वय समितीची बैठक संपन्न…

उपमुख्यमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी 1 महिन्यात झाली पाहिजे. अन्यथा चाळीसगाव तहसील कार्यालया समोर धनगर समाज समन्वय समिती तीव्र आंदोलन छेडेले जाईल असा इशारा प्रशासनाला दिला आहे.


चाळीसगाव तालुक्यातील धनगर समाज बांधवाची समाजातील विविध विषयावर चाळीसगाव शहरातील शासकीय विश्रामगृह, सकल धनगर समाज समन्वय समिती ची बैठक चर्चा संपन्न झाली.

महाराष्ट विधान भवन, मुंबई येथे दि.27 जून 2024 रोजी उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्री, आमदार, अधिकारी यांचे उपस्थितीत झालेल्या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले. 1) आरक्षण अभ्यास समितीने आणखी दोन राज्यांचा (उत्तर प्रदेश, छत्तीसगड) अभ्यासदौरा पूर्ण करुन जुलै अखेर अहवाल सादर करावा त्याआधारे राज्यशासन केंद्र शासनाकडे शिफारश करुन दुरुस्ती किंवा धनगर/धनगड एकच असल्याचा निर्णय होण्यासाठी पाठपुरावा करणार 2) धनगर समाजातील बेरोजगारांना आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर व्यवसाय,उद्दोगासाठी रु.20 लाख इतके बिगरव्याजी कर्ज देणार 3) मेंढपाळ बांधवांनी स्व संरक्षणासाठी शस्रपरवाना मागणी केल्यास तातडीने कार्यवाही करणार 4) धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंम ही वसतिगृह योजना अधिक सक्षम करणार. ज्या विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृह मिळणार नाही, त्याला रु.60हजार इतकी रक्कम रोख देणार. 5)राज्याच्या आठ महसूली विभागात धनगर समाजासाठीची वसतिगृहे बांधून तयार होईपर्यंत तेथे इमारती भाडोत्री घेऊन धनगर समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृह सुविधा बहाल करणार 6) मेंढपाळांच्या शेळ्या मेंढ्या साठी नाममात्र 1रु.घेऊन विमाकवच देण्याचा निर्णय घेतला. 7)पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळास तातडीने निधी तरतूद करणार. वरील सर्व निर्णयांची तातडीने व अग्रक्रमाने अमलबजावणी करण्याचे आश्वासन उपमूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी वरील निर्णयांची तातडीने व अग्रक्रमाने एक महीन्यात अमलबजावणी करण्याची ग्वाही दिली. वरील निर्णयाची अंमलबजावणी 1 महिन्यात झाली पाहिजे. अन्यथा चाळीसगाव तहसील कार्यालया समोर धनगर समाज समन्वय समिती तीव्र आंदोलन छेडेले जाईल असा इशारा प्रशासनाला दिला आहे.

यावेळी पत्रकार दीपक गढरी यांची माहिती अधिकार फेडरेशन महाराष्ट्र राज्य – सहसंपर्क पदी निवड झाल्याबद्दल समन्वय समिती तर्फे सत्कार करण्यात आला.

बैठकीला देवचंद साबळे,मारोती काळे, विशाल धनगर, समाधान जाने, आबा जाने, कीरण वाघमोडे, सन्तु पोकळे, किशोर रावते, संदीप येवस्कर, भास्कर सूर्यवंशी, शेखर भदाणे उपस्थितीत होते, बैठकीचे प्रास्ताविक विठ्ठल शिंगाडे सर , सूत्रसंचालन संजय गढरी यांनी, तर ज्येष्ठ नेते शिवाजी नाना हडपे, देवचंद साबळे, कीशोर रावते , मारोती काळे यांनी विचार मांडले, आभार संदीप लांडगे यांनी मांडले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे