आपल खान्देश

पाचोरा येथील पत्रकाराचा नाशिक येथे रेल्वेच्या धक्क्याने निधन!

दुर्दैवी घटना घडल्यानंतर पाचोरा शहरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहॆ

पाचोरा : शहरातील भडगाव रोडवरील दत्त कॉलनी परीसरातील रहिवासी व पोलिस आजतक या साप्ताहिकाचे संपादक प्रवीण (बाबा) दिवटे ( 45 ) यांचे गुरुवार, 17 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान नाशिकरोड येथे रेल्वेच्या धक्क्याने निधन झाले.

नाशिक लोहमार्ग पोलिसात मृत्यूची नोंद प्रवीण दिवटे हे गेल्या आठ दिवसांपूर्वी नाशिक येथे आपल्या कुटूंबियासह वास्तव्यास गेले होते मात्र अशी दुर्दैवी घटना घडल्यानंतर पाचोरा शहरातही हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. मृत्यूप्रकरणी नाशिक येथील रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेहावर  आज शुक्रवार, 18 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते पाचोरा येथील बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सहाय्यक रामजी धनजी दिवटे यांचे मोठे चिरंजीव व युनियन बँकचे कर्मचारी संदीप दिवटे यांचे मोठे बंधू होत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे