आपल खान्देशब्रेकिंग

आखतवाडे गावात दारूबंदी, अवैध व्यवसाया विरोधात एक तरुण सरसावला,

गावात काही अवैध धंदे बंद करण्यासाठी व दारुबंदी साठी ग्रामपंचायतीने तातडीने ठराव करावं ही विनंती करत निवेदन दिले..

पाचोरा (झूम मराठी) तालुक्यातील नगरदेवळा जवळील आखातवाडे गावात आणि गाव परिसरात बेकायदेशीर दारु विक्री चालू आहे. त्यामुळे गावातील तरुण पिढी उध्वस्त होत आहे. काही गरिबांचे संसार उघड्यावर येत आहेत. गावात काही अवैध धंदे बंद करण्यासाठी व दारुबंदी साठी ग्रामपंचायतीने तातडीने ठराव करावं ही विनंती करत आखतवाडे येथील आरटीआय कार्यकर्ते मुरलीधर परदेशी यांनी मुख्यधिकारी जळगाव व तालुका गट अधिकारी (बी डी ओ) तसेच ग्रामपंचायत सरपंच यांना निवेदन दिले.

गावात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू खुलेआम विकली जात आहे. सोबतच अवैध धंद्यांना ऊत आला आहे. अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनाधीन होत असल्याने महिलांना व लहान मुलांना त्रास होत आहे. गावात काही अवैध धंदे बंद करण्यासाठी व दारुबंदी व्हावी म्हणून आखतवाडे येथील आरटीआय कार्यकर्ते मुरलीधर परदेशी यांनी निवेदनात महिला प्रतिनिधी व महिला सरपंच यांना विनंती केली आहॆ, आखतवाडे ग्रामपंचायतीत नऊ लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. ९ पैकी पाच महिला आहेत. त्यामुळे बहुमताच्या सर्व अधिकार तुमच्या कडे आहेत. आणि त्यात सरपंच पद महिला राखीव असल्यामुळे गावात दारुबंदी चा ठराव तातडीने करुन तरुण पिढीला आपण वाचवू शकता. आपण केलेल्या दारुबंदी चा ठरावाची प्रत जवळच्या पोलिस प्रशासनाला द्यावे. व आखतवाडे ग्रामपंचायत हद्दीत साधारण दोन ते तीन किलोमीटर पर्यंत कडक बेकायदेशीर दारुबंदी करण्याची विनंती पोलिस प्रशासनाला करावी. अश्या प्रकारे त्यानी निवेदन दिले आहॆ.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे