आपल खान्देश

पाचोरा येथील वीरजवान चेतन हजारे यांना अश्रूनयनानी अखेरचा निरोप…

जवानास अखेरचा निरोप

पाचोरा शहरातील रहिवासी असलेले जवान चेतन हजारे ह्यांचे मिझोराम येथे सीमा सुरक्षा दलात कर्तव्यावर असताना वीरमरण आले आज त्यांच्यावर शासकीय इतमामत अंत्यसंस्कार करण्यात आले.

वीर जवान चेतन हजारे यांचे पार्थिव आज सकाळी पाचोरा शहरात दाखल झाले. यानंतर पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील, भाजपचे अमोल शिंदे, डीवायएसी धनंजय वेरूळे, पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्यासह मान्यवरांनी वीर जवानाचे अंत्यदर्शन घेत पार्थिवावर पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलिसांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानाला अखेरची मानवंदना दिली. यानंतर वीर जवान चेतन हजारे यांना अखेरचा निरोप देत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • मिझोरम राज्यात होती पोस्टिंग

पाचोरा शहरातील देशमुखवाडी भागातील रहिवासी असलेले चेतन हजारे (वय, 29 वर्ष) हे विवाहित तरुण मिझोराम येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. कर्तव्यावर असताना 15 जून शनिवार रोजी रात्री 10 वाजता त्यास वीरमरण आले. सुमारे 10 वर्ष त्याने देशसेवा बजावली. दरम्यान, त्यांच्या पश्चात आई, वडील, एक बहीण, जावई, पत्नी दोन मुले असा परिवार आहे.

अंत्यसंस्कारावेळी परिसरातील लोक मोठ्या संख्येने शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. दरम्यान, शहीद जवान चेतन हजारे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी राष्ट्रध्वज जवानाच्या आईकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे