ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी नवजात बाळांसाठी किटचे वाटप करून, आदित्य ठाकरेंचा वाढदिवस साजरा
भडगाव, दिनांक १३ (प्रतिनिधी ) : युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भडगाव तालुक्यातील विविध हॉस्पीटल्समध्ये जन्माला आलेल्या बालकांसाठी त्यांच्या मातांना किटचे वाटप करण्यात आले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पाचोरा आणि भडगाव तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यात प्रामुख्याने नुकत्याच जन्माला आलेल्या बाळांसाठी त्यांच्या मातांना जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या किटचे वाटप करण्यात आले. यात भडगाव तालुक्यातील सिध्दीविनायक हॉस्पीटल, सुमन हॉस्पीटल, ओम हॉस्पीटल, आशीर्वाद हॉस्पीटल, लिलावती हॉस्पीटल आणि शासकीय ग्रामीण रूग्णालयातील मातांना सदर किट वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह योजनाताई पाटील, पुष्पाताई परदेशी, दीपक आधार पाटील, जे. के. पाटील, शंकर मारवाडी, माधव जगताप चेतन पाटील, नरेंद्रसिंग सुर्यवंशी ( भैयादादा); संदीप ठाकरे, चेतन र. पाटील, रोनीत अहिरे, देवेंद्र धोबी, संकेत सोमवंशी, दुर्गेश काळे, कपिल जाधव, अमोल पाटील, भूषण देवरे, नवल राजपूत, हितेश मारवाडी यांच्यासह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





