आपल खान्देशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी करण पवार यांना पराभवाची चारली धूळ..

स्मिताताई वाघ यांनी तब्बल जवळपास २ लाख मतांनी आघाडी घेतली असून विजय मिळविला आहे. यामुळे जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

लोकसभा निवकणुकीसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहीर झाला असून यात जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांना पराभवाची धूळ चारली आहे. दरम्यान, विजय मिळविल्यानांतर स्मिताताई वाघ यांनी प्रतिक्रिया दिली.

लोकसभेसाठी तिकीट जाहीर झाल्यापासून हि निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्ष केलेला विकास आम्ही जनतेपर्यंत घेऊन गेलो होतो. यामुळे नक्कीच हा विकासाचा विजय असल्याचे मत स्मिता वाघ यांनी बोलताना दिली आहे. या विजयानंतर स्मिता वाघ यांनी माध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे.

भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांना ५,१०,४७२ मते मिळाली आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार पाटील यांना ३ लाख १४ हजार ६७० मते मिळालेली आहे. त्यानुसार स्मिताताई वाघ यांनी तब्बल दोन लाख मतांनी लीड घेतली असून विजय मिळविला आहे.

स्मिता वाघ यांनी सांगितले कि विरोधकांनी त्यांच्या पद्धतीने काम केले, आम्ही आमच्या पद्धतीने काम केले. कामावर श्रद्धा ठेवली. सर्व नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली असून मतदारांनी जो विश्वास दाखविला त्याबद्दल आभार. तसेच आता जळगाव जिल्ह्यातील सिंचनाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा माझा मानस राहील. कारण शेतकरी राजा खुश झाला तर जनता खुश होईल. तसेच नवीन उद्योग आणण्यासाठी आगामी काळात काम करणार असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे