आपल खान्देश

पाचोरा जवळ धावत्या कामाख्या एक्सप्रेसला जेसीबीचा लागला धक्का! लोकोपायलटच्या सतर्कने अपघात टाळला!

कामाख्या एक्सप्रेसने जेसीबीला काही अंतरावर फरफटत नेले.

झूम मराठी वृत्त

भरधाव वेगाने जाणाऱ्या कामाख्या एक्सप्रेसला पाचोरा जवळ परधाडे रेल्वे स्थानकानजीक जेसीबीचा लागला धक्का मात्र लोकोपायलटच्या सतर्कने अपघात टाळला. सदर घटना परधाडे रेल्वे स्थानकाजवळ घडली. यामुळे मोठ्या हानीची शक्यता असतांनाही सुदैवाने अपघात टळला. मात्र काही सेकंदाच्या या घटनमुळे गाडीतील प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकल्याचे दिसून आले. 

कामाख्याहुन लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणारी कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेस ( क्रं. १२५२० अप) ही जळगांव स्थानकावरुन आज दि. ४ जुन रोजी सकाळी १० वाजुन २३ मिनिटांनी रवाना झाली. दरम्यान पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकानजीक (रेल्वे कि. मी. क्रंमाक ३७९ / ८) रेल्वे लाईन लगत रेल्वे रुळा खाली बसविण्यात येणारे सिमेंटचे ब्लॉक जे. सी. बी. च्या सहाय्याने ठेवण्याचे काम सुरू होते. यावेळी कामाख्या एक्स्प्रेस भरधाव वेगाने जात असतांना सदर जे. बी. सी. चा पुढील भाग कामाख्या एक्स्प्रेसच्या लोकोपायलटच्या निदर्शनास येताच लोकोपायलट ने जोरात हॉर्न वाजवुन सूचना दिला. मात्र याकडे जेसीबी चालकाने दुर्लक्ष केले. यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या कामाख्या एक्स्प्रेसच्या इंजिनच्या डाव्या बाजुच्या चाकाजवळ जेसीबीचा पुढील भाग धडकला. यावेळी मोठा आवाज झाल्याने काहीवेळ प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान एक्स्प्रेसने जेसीबीला काही अंतरावर फरफटत नेले.

लोकोपायटलने गाडी कंट्रोल करत थांबवली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नसली तरी पुढील होणारा अनर्थ मात्र निश्चित टळला. कामाख्या एक्स्प्रेसला घटनास्थळी सुमारे एक तास खोळंबा झाल्यानंतर जेसीबी बाजुला हटविल्यानंतर धीम्या गतीने पाचोरा रेल्वे स्थानकावर दुपारी १२ वाजुन ५३ मिनिटांनी प्लॅट फार्म क्रमांक १ वरील लुप लाईनलावर थांबविण्यात येवुन भुसावळ येथुन दुसऱ्या इंजिनला पाचारण करण्यात आले. भुसावळहुन इंजिन आल्यानंतर क्षतीग्रस्त झालेले इंजिन बाजुला करुन कामाख्या एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दिशेने रवाना करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे