आपल खान्देश

पाचोऱ्यातील लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्था आयोजित भव्य वारकरी बालसंस्कार शिबीर

आजचा बालक उद्याचा युवक असून भारत देशाचे भविष्य आजच्या बालकांच्या हातात आहे. त्याकरिता आजचा बालकांना संस्कारक्षम असणे गरजेचे आहे हे लक्षात घेता मागील वर्षाप्रमाणे पाचोरा शहरातील लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्था मध्ये उद्या पासून दहा दिवशीय निशुल्क वारकरी बालसंस्कार शिबीर सुरु होणार असून आपल्या बालकांना बाल वयात धार्मिक संस्कार देण्यासाठी या शिबिरात आपल्या बालकांना पाठवन्याचे आवाहन या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, गुरूवर्य विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर व ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर माऊली, सातगाव यांच्या आशिर्वादाने आपल्या संस्थेमार्फत भव्य बालसंस्कार शिबीर घेण्यात येत आहे. कारण आजचा बालक उद्याचा युवक आणि परवाचा नागरीक आहे. देशाचे उद्याचे भविष्य आजच्या बालकांच्या हातात आहे. त्याकरिता आजचा बालक संस्कारक्षम असणे गरजेचे आहे. आजच्या युगात टिव्ही, मोबाईलच्या माध्यमातून अनेक वाईट सवयी मुलांना लागल्या आहेत. समाज अनेक वाईट व्यसनांच्या आहारी जात आहे, मोबाईल टीव्ही युट्युब व्हिडीओ या वातावरण मुळे बालक पालकांचे ऐकत नाही, याला आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी धार्मिक संस्कार शिबीर तसेच संस्कार केंद्र घेण्याची गरज आहे. हे लक्षात घेवून आपल्या लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्था पाचोराने भव्य बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगण्यात आले.

बालसंस्कार शिबीरात योगासन, गितेची संहिता, हनुमान चालिसा, मृदंग मार्गदर्शन, सुंदरकांड गायन, वारकरी भजन हरिपाठ, वारकरी पावल्या, मंत्रपुष्पांजली, धार्मिक जन जागरण आदी विषय शिकवले जाणार आहे.

  • शिबीरातील नियम काय आहेत 

शिबीरात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोबत आंथरूण, पांघरूण, ताट, तांब्या, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू आणाव्या. २) शिबीरात गैरवर्तन केल्यास घरी पाठविले जाईल,

शिबीरात मोबाईल व कॅमेरा वापरण्यास सक्त मनाई आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.

शिबीरात येतांना सोबत धोतर, नेहरू सदरा, टोपी, पांढरा पोषाख सोबत आणावा.

सोबत येतांना विद्यार्थी व पालकांचे आधारकार्ड (झेरॉक्स) आणणे अत्यावश्यक आहे.

शिबीरा दरम्यान विद्यार्थ्यास शारिरीक दुखापत किंवा जिवीत हानी झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही.

  • ठिकाण

वारकरी भवन, रामदेव लॉन्सच्या पाठीमागे, जारगाव चौफुली, पाचोरा

  • आयोजक

ह.भ.प.सौ. सुनिताताई पाटील ह.भ.प. भागवताचार्य योगेशजी महाराज, धामणगावकर

अध्यक्ष-लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्था, पाचोरा

संपर्क – ९५४५८५५२४३, ७७९८७५५४३१

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे