आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

करण पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल, ऐतिहासिक विजयाचा विश्वास!


  • दिलीप जय परदेशी.

ळगाव (झूम मराठी) महा विकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघातून करण पवार (पाटील) यांना उमेदवारी जाहीर झालीये.त्यात खासदार उन्मेष पाटील यांनी भाजप सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे भाजपलाही मोठा धक्का बसला असून जळगावच्या राजकारणात भाजप अधिक सक्रीय झालंय. आज ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांनी संजय राऊत, जयंतराव पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या जळगाव आणि रावेर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. जळगाव मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील तर रावेरातून शरद पवार गटाचे श्रीराम पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून जिल्ह्यात भाजपासाठी कडवे आव्हान उभे करण्यात आले आहे. जळगावातून भाजपाच्या स्मिता वाघ तर रावेरातून विद्यमान खासदार रक्षा खडसे ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक अर्ज भरला. त्यावेळी निघालेल्या रॅलीस मतदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. हा प्रतिसादच येण्याच्या विजयाची चाहूल देतो आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या या लोकसभा निवडणुकीत पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आदरणीय शहर पवार साहेब, आदरणीय नाना पटोले या मान्यवर नेत्यांच्या आशीर्वादाने मला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची व महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली आहे असे मीडियाशी बोलतांना करण पवार म्हणाले.

रॅली शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत,  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, संजय सावंत, उन्मेष पाटील शिरीष चौधरी आदी मान्यवरांनी खास उपस्थिती दिली. त्यांचेसह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेतेगण, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे