आपल खान्देश

बदलापूरात लसीकरण केंद्रावर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

बदलापूर (ठाणे) : बदलापुरात कोरोना लसीकरण केंद्रावरच शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. बदलापूर पालिकेच्या दुबे रुग्णालयात आज  दुपारी हा प्रकार घडला. हाणामारीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे

कोरोना लसीकरण केंद्रांवर राजकीय कार्यकर्ते वशिलेबाजी करत असल्याच्या तक्रारी बदलापुरात अनेकदा समोर आल्या होत्या. त्यातच आज बदलापूर पालिकेच्या दुबे रुग्णालयात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते थेट एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळालं. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. अक्षरशः खाली पाडून लाथाबुक्यांनी एकमेकांना तुडण्यात आलं. याचवेळी एका गटाच्या कार्यकर्त्याने दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात थेट बेंच टाकला

या सगळ्यामुळे लसीकरण केंद्रावर काही काळ मोठा तणाव निर्माण झाला. हाणामारीचा हा सगळा प्रकार लसीकरण केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. अशा राडेबाज कार्यकर्त्यांमुळे राजकीय पक्षांची प्रतिमा मात्र मलीन झाली आहे. दरम्यान या प्रकाराबाबत बदलापूर पूर्ण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे