महाराष्ट्र

नगरपालिका निवडणूकीसाठी प्रभाग रचनेचे कच्चे आराखडे करण्याचे आदेश

झूम मराठी टीम, 21 ऑगस्ट 2021 :- राज्यातील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहे. १५० नगरपरिषद व नगरपंचायतसाठी राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी लेखी आदेश काढून नगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहे.

त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणाऱ्या पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. माहे डिसेंबर २०२१ व फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश प्रारीत करण्यात आले आहे. शासनाने १२ मार्च २०२० रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम २०२० अन्वये सर्व नगरपालिकांमध्ये बहुसदस्यसीय प्रभाग पद्धती ऐवजी एक सदस्यसीय प्रभाग पद्धत्ती लागू केली आहे.

नगरपालिकांची मुदत समाप्ती पूर्वी निवडणुका पार पाडणे शक्य होण्यासाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा २३ ऑगस्ट २०२१ पासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्यातील १५० नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकीसाठी प्रभाग रचनेचे तयारी सुरू झाल्याने निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे