गुन्हेगारी

पाचोरा शहरातील भुषण शेवरे खून प्रकरणी, उर्वरित ३ आरोपीही जेरबंद!

झूम मराठी वृत्त

पाचोरा पाचोरा शहरात दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी भुषण नाना शेवरे (वय २३) या – युवकाचा तीक्ष हत्याराने भोसकुन खुन करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेतील ८ आरोपींपैकी ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित राहुल उर्फ मॉडी पाटील, चेतन उर्फ स्टायलेश पाटील व पवन पाटील (पुर्ण नाव माहीत नाही) यांना पाचोरा पोलिसांनी दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. तिन्ही आरोपींना पाचोरा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असुन सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता आर. के. माने यांनी काम पाहिले आहे. तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पोलिस हेड कॉन्स्टेबल दिपक (आबा) पाटील व कोर्ट केसवाच म्हणुन पोलिस नाईक विकास सुर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे