आरोग्य व शिक्षणदेश-विदेशमहाराष्ट्र
आता ऑनलाईन रजिस्टर न करता 18 ते 44 वयोगटालाही मिळणार लस
सरकारने आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना जागेवर नोंदणी आणि लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही सुविधा केवळ सरकारी कोविड लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. सध्या ही सुविधा खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार नाही.
देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळं स्थिती बिकट आहे. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरी मृतांची संख्या मात्र चिंताजनक आहे. अशा स्थितीत लसीकरण वाढवण्यावर भर देणं गरजेचं आहे. त्यातच आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना नोंदणीशिवाय लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 44 या वयोगटातील नागरिक नोंदणीशिवाय थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. तेथे पोचल्यानंतर त्यांची नोंदणी कोविन ॲपवर cowin.gov.in केली जाईल. काही राज्यांमध्ये लोक ऑनलाइन स्लॉट बुकिंग केल्यानंतरही लस घेण्यासाठी त्यांच्या ठरलेल्या दिवशी गैरहजर राहतात. त्यामुळं लस वाया जाण्याचीही शक्यता असते. तसेच ग्रामीण भागातील लोकांमध्ये अद्यापही ऑनलाईन नोंदणी विषयी पुरेशी माहिती नसल्यामुळं नोंदणी होण्यात बऱ्याच अडचणी येतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
______________जाहिरात __________

अशा परिस्थितीत सरकारने आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना जागेवर नोंदणी आणि लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही सुविधा केवळ सरकारी कोविड लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. सध्या ही सुविधा खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार नाही. खासगी केंद्रांमध्ये लसीकरणासाठी अद्याप ऑनलाइन नोंदणीद्वारेच स्लॉट बुक करावे लागतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते-ते संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांवर अवलंबून आहे की, त्यांना हा निर्णय लागू करायचा आहे की नाही. ऑनलाईन नोंदणीची सुविधा राबविण्यासाठी आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यांना जिल्हा प्रशासनाबरोबर काम करण्याचे आदेश दिले आहेत.




