आपल खान्देशसखी

पाचोऱ्यात पर्यावरणपूरक रंगोत्सवात रंगल्या माता-भगिनी… 

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद


पाचोरा, दिनांक २५ (प्रतिनिधी) पारंपरिक होळीच्या उत्सवाला पर्यावरणपुरकतेची जोड देत शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यातर्फे आज रंगोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात हजारो माता-भगिनींनी सहभाग घेऊन चैतन्यदायी वातावरणात हा उत्सव साजरा केला.

आज सर्वत्र धुळवळ उत्साहात साजरी करण्यात आली. याचे औचित्य साधून वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी जयकिसान कॉलनीतील *शिवतीर्थ* येथे रंगोत्सव या अतिशय शानदार कार्यक्रमाचे आयोजन केले. यात कोणत्याही प्रकारचा कृत्रिम रंग न वापरता नैसर्गिक रंगांनी युक्त कोरडी होळी खेळण्यात आली. एकमेकांना रंग लाऊन हजारो महिलांनी होळीचा आनंद लुटला. यात सहभागी महिलांशी वैशालीताईंनी संवाद देखील साधला. तर यानंतर स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह योजनाताई पाटील, तिलोंत्तमा मौर्य, जयश्री येवले, सुनिता पाटील, सह समस्त पदाधिकारी कार्यकर्ते व महिलांची उपस्थिती होती आदींची उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे