निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये को-व्हॅक्सीन लसीकरण मोहीम
शाळेतील सुमारे 92 विद्यार्थ्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला
निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये Covaxin लसीकरण मोहीम संपन्न!
पाचोरा निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 15 ते 18 वयोगटातील इयत्ता 10 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने निर्देशित केलेल्या Covaxin लसीकरण करण्यात आले. शाळेतील सुमारे 92 विद्यार्थ्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला. पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली विकी पाटील व ज्योस्त्ना पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण केले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ. वैशाली सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्त्व थोडक्यात सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या. लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी प्राचार्य श्री. गणेश राजपूत उपप्राचार्य श्री. प्रदीप सोनवणे प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील तसेच शाळेतील क्रीडाशिक्षक श्री. सुशांत जाधव श्री. दिलीप चौधरी श्री. नंदू पाटील व सौ. लक्ष्मी पाटील यांनी लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

