आपल खान्देशदेश-विदेश

धक्कादायक : कुऱ्हाडच्या सीआयएसएफ जवानाची ओडीसा येथे आत्महत्या

झूम मराठी न्यूज टीम । १९ ऑगस्ट २०२१ । सीआयएसएफमध्ये ओडीसा येथे कार्यरत असलेल्या कुऱ्हाड ता.पाचोरा येथील गोपाल अरुण सूर्यवंशी वय-२९ याने चिखला येथील सीआयएसएफ मुख्यालय येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली.

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील गोपाळ हा २०१६-१७ ला सीआयएसएफमध्ये भरती झाला होता. मध्यप्रदेश येथील बडवणी येथे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्याची पहिली नेमणूक ओडीसा येथे झाली होती. तेव्हापासून गोपाल हा ओडीसा येथे जनरल ड्युटी कॉन्स्टेबल पदावर रुजू होता. पत्नी आणि १ वर्षाच्या मुलासह गोपाल त्या ठिकाणी वास्तव्यास होता शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात आत्महत्या केली. गोपाळने गळफास घेतल्याचे समजते. घटना लक्षात येताच त्याच्या पत्नीने कुटुंबियांना व वरिष्ठांना कळविले.

गोपालच्या निधनाची बातमी कळताच गोपालच्या परिवारासह कुऱ्हाड परिसरातील नागरिकांना धक्काच बसला. गोपाल हा अत्यंत मनमिळावू स्वभावाचा असल्याने कुऱ्हाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गोपालच्या निधनाची बातमी कळताच पाचोरा तहसीलदार  व कुऱ्हाड येथील तलाठी भरत परदेशी यांच्यासह जिल्हा शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अरुण पाटील, सरपंच कैलास भगत, ग्राम पंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक यांनी गोपालच्या परिवाराची भेट घेत सांत्वन केले. यावेळी त्यांनी गोपालचे कुटुंबीय, मामा व गावकऱ्यांसोबत चर्चा केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे