आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोऱ्याच्या या शिक्षकाच्या हातात आहे कला; रंगीत खडूंच्या सहाय्याने बोर्डवरच साकारले ‘सुवर्णयुग माझ्या शिवबाचे’..

शिवाजी महाराजांचे जयंतीनिमित्त बोर्डवर रेखाटलेले चित्र सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे


  • दिलीप जय परदेशी

शिक्षक आणि शाळा आठवलं की समोर येतो तो वर्गातील काळा फळा. या काळ्या फळ्यावर अंक आणि अक्षरांशिवाय क्वचितच दुसरे काही नजरेत पडते. मात्र पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथील शाळेत एक शिक्षक याच काळ्या फळ्यावर रंगीत खडूंच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लक्षवेधक चित्र रेखाटतात. सुनील भिवसने असे या शिक्षकाचे नाव आहे. 

कलाशिक्षक सुनील भिवसने यांनी शाळेच्या दर्शनी फलकावर रंगीत खडूच्या माध्यमातून ‘सुवर्णयोग माझ्या शिवबाचे’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या कलाकृतीचा सुंदर असा प्रसंग संध्याकाळी रयतेच्या शेत शिवारात फेरफटका मारताना छत्रपती शिवाजी महाराज व मावळे शेतकरी यांचा हूबेहूब, बोलके सुंदर असा प्रसंग रेखाटला आहे असे मनमोहक सर्वांना आवडणारे चित्र पाहून विद्यार्थी व पालक भारावले आहेत आजच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांनी याच खडूंच्या सहाय्याने शुभेच्छा चित्र रेखाटले आहे. हे चित्र रेखाटण्यासाठी त्यांना अडीज तासाचा अवधी लागला. शिवजयंती असल्याने त्यांचे हे चित्र लागलीच व्हायरल झाले. आकर्षक रंगसंगतीत रेखाटलेली ही चित्रे शिक्षकांच्या वर्तुळात चर्चेची ठरली. यातूनच त्यांची रेखाटने सोशल मीडियातून व्हायरल झाली. अंक आणि अक्षरांशिवाय काळ्या फळ्यावरची ही आकर्षक रेखाटने सध्या चर्चेची ठरत आहेत. 

मेहनत आणि कल्पकतेच्या सहाय्याने शिवाजी महाराजांचे जयंतीनिमित्त त्यांनी रेखाटलेले चित्र सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे. बोलके सुंदर असा प्रसंग रेखाटला आहे असे मनमोहक सर्वांना आवडणारे चित्र पाहून विद्यार्थी व पालक भारावले आहेत, त्यांच्या या कलाकृती बद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, संस्थेचे चेअरमन संजय नाना वाघ, मानद सचिव ऍड. महेश देशमुख, व्हा.चेअरमन विलास जोशी, शालेय समिती चेअरमन खलील दादा देशमुख, तांत्रिक विभागाचे वासुदेव महाजन, मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे, पर्यवेक्षक आर एल पाटील, ए. बी. अहिरे, पर्यवेक्षिका अंजली गोहिल ,सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी यांनी अभिनंदन केले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे