आपल खान्देशब्रेकिंग

सकाळी फिरायला गेलेल्या पत्रकार प्रमोद सोनवणे यांचा सर्पदंशाने मृत्यू


पाचोरा : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रमोद हिम्मत सोनवणे (वय ४२) यांचे सर्पदंश झाल्याने मृत्यू ओढवल्याची दुर्दवी घटना रविवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे देखील अल्पशा आजाराने निधन झाले होते, त्यामुळे सोनवणे परिवारावर मोठा आघात झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव येथील रहिवासी असलेले प्रमोद सोनवणे हे नित्यनियमा प्रमाणे रोज सकाळी फिरायला गेले असता अंधारात त्यांना अचानक काहीतरी चावल्याची जाणीव झाल्याने त्यांनी सहकारी मित्र अबरार मिर्झा यांना याबाबत सांगितले, त्यामुळे मिर्झा यांनी त्यांना तातडीने पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान पाचोरा ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात १ मुलगी, १ मुलगा आई, भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे