महाराष्ट्र

‘मल्हार महोत्सव २०२२’ पुण्यात १५ जानेवारीला – गोपीचंद पडळकर

झूम मराठी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील बहुजनांना एकत्रित करण्यासाठी, परंपरा जोपासण्यासाठी भारतीय जनता पार्टीने १५-१६ जानेवारीला पुण्यातील बालगंधर्व येथे ‘मल्हार महोत्सव २०२२’ आयोजित केला आहे, अशी माहिती भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.

पडळकर म्हणालेत की “पोतराज, गोंधळी, बहुरुपी, गजीनृत्य, दशावतार, लावणी, नंदीबैल, कडक लक्ष्मी, वासुदेव या परंपरा जतन करायला पाहिजेत. ज्यांनी या क्षेत्रात योगदान दिले आहे, ज्यांनी या संस्कृतीचे जतन केले आहे त्यांच्या मुलाखती या महोत्सवात होणार आहेत. अनेक गावगाड्याच्या लोककला लोप पावत आहेत. हा गावगाड्याचा आत्मा आहे. या लोककलावंताना आम्ही या महोत्सवाद्वारे पाठबळ देणार आहोत. या कला जोपासणाऱ्या राज्यातील सर्व कलाकारासाठी हे व्यासपीठ उपलब्ध आहे.”

संस्कृतीचे अदान-प्रदान झाले पाहिजे. संवाद झाला पाहिजे. हा महोत्सव आम्ही सण म्हणून साजरा करतो आहे. या महोत्सवाला राजकीय पार्श्वभूमी नाही. बहुजनांना एकत्रित करणं आवश्यक आहे. हे याआधी कोणी केले नाही. आपण कितीही मोठं झालो तरी आपलं मूळ विसरता कामा नये. प्रत्येक समाजाचं वेगळंपणे आहे. प्रस्थापित समाजातून या परंपरा बाजूला पडत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे