पाचोरा शहरातील तलाठी कॉलनीतील रहिवाशी निवृत्त वीजकर्मचारी गोकुळ सोनार यांची नात मुलाची मुलगी अनुष्का सचिन दुसाने वय (7वर्ष) हि पाच दिवसा पासून आजारी होती आज दिनांक 19 जाने राजी दवाखान्यात उपचारा दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दवाखान्यात पालकांनी हंभरडा फोडत आक्रोश केला.
पाचोरा शहरातील तलाठी कॉलनीतील रहिवाशी गोकुळ सोनार यांचा लहान मुलगा कामा निमित्ता शिरसोलीत राहणारा लहान मुलगा सचिन दुसाने यांची लहान मुलगी अनुष्का हिला पाच दिवसा पूर्वी ताप उतरता-उतरत नव्हता अनुष्काला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला जळगाव नेण्याचा सल्ला दिला आणि जळगाव येथे उपचारासाठी पल्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले तिला टायफाईड झाल्याचे निदान सांगण्यात आले, दोन दिवसांनी तिची तब्येत खालावल्याने तिला गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले तिच्यावर उपचार सुरु दरम्यान आज सकाळी ती मृत पावली या दुर्दैवी घटनेने परिसरात नव्हे पाचोरा शहरातील हळ हळ व्यक्त होत आहे. तिची अंत यात्रा पाचोरा येथून निघणार आहे.
लहानपणीच चांगल्या प्रकारे तीच्या शाळेत डान्स करायची छोट्याशा वयात मोठे स्वप्न बघणारी अनुष्का अवघ्या सातव्या वर्षी जग सोडून गेल्याने नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.




