श्रीराम मंदिर प्रतिष्ठापणा दिवशी शहरातील मद्यासह मांस मच्छी विक्री दुकाने बंद ठेवावी पाचोरा भाजपाचे निवेदन
पाचोरा अयोध्या नगरीमध्ये ५०० वर्षाच्या संघर्षानंतर व न्यायालयीन लढाईनंतर प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ सोमवार,रोजी होणार असून देशात भक्तीमय वातावरणात असणार त्या अनुषंगाने शहरातील सर्व मद्य विक्री दुकाने, बार आणि मांसविक्री करणारे सर्व दुकाने बंद ठेवाण्याचे निवेदन देण्यात आले.

श्रीराम प्राणप्रतिष्ठानिमित्ताने देशात आनंदाचे वातावरण असून ठिकठिकाणी मंदिरांना रंगोटी लायटिंग पताके सजावट कलश यात्रा कीर्तने अशा वेगवेगळ्या कारक अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या भक्तीमय वातावरणात 22 जानेवारी रोजी घरोघरी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पाचोरा शहर यांच्या माध्यमातून पाचोरा शहरातील सर्व मद्य विक्री दुकाने,बार आणि मांसविक्री करणारे सर्व दुकाने २२ जानेवारी २०२४ सोमवार रोजी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
त्या आशयाचे निवेदन आज भाजपा शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने पाचोरा नगरपरिषद व पाचोरा पोलीस स्टेशन यांना देण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष दिपक माने, जगदीश पाटील, समाधान मुळे, विष्णू अहिरे, स्वप्नील सोनार, योगेश ठाकूर, राहूल गायकवाड, विरेंद्र चौधरी, प्रदिप पाटील, मनीष भावसार, सोहन मोरे, गोकुळ दारकुंडे, आशिष जाधव, अमोल वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.




