आपल खान्देशराजकीय

नगरदेवळा बाळद गटातील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूकित शिवसेनेला धक्का..


पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील वि.का.सोसायटी पाठोपाठ आता नेरी ता.पाचोरा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा प्रणित युवा शक्ती पॅनलने शिवसेनेचा सुपडा साफ करत भाजपाचा सर्वच्या सर्व १३ जागांवर दणदणीत विजय मिळवला असुन नेरी वि.का.सोसा.मध्ये निवडुन आले.

नेरी वि.का.सोसायटीच्या विजयासाठी गावांतील तरुण,जेष्ठ नागरिक,महिला व सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली असून हा विजय संपूर्ण गावाचा विजय आहे. तसेच येणाऱ्या काळांत वि.का.सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कश्या पद्धतीने विविध सेवा सुविधा देत येतील यासाठी आम्ही कटीबद्ध राहू असे निवडुन आलेल्या सर्व नवनिर्वाचित संचालकांनी सांगितले.  

तसेच विविध कार्यकारी सोसायटी च्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी नगरदेवळा- बाळत गट ताब्यात घेण्यासाठी एका प्रकारे मोर्चे बांधणी सुरू असुन या गटातील जिल्हा परिषद निवडणुकीत नगरदेवळा,बाळद,नेरी यासारख्या मोठ्या गावांचे मताधिक्य निर्णायक ठरत असते.त्यामुळे भारतीय जनता पार्टीने ही सर्व गावे जी एकेकाळी शिवसेनेचे बालेकिल्ले म्ह्णून ओळखली जात होती.तीच गावे सर करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगल्या प्रमाणात यश ह्या गटांत मिळु शकते अशी चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.

विजयी उमेदवार.

पाटील अशोक शिवराम, पाटील रवींद्र पुंडलिक, पाटील साहेबराव झावरु, पाटील अशोक धर्मराज, सूर्यवंशी विजय रामराव, पाटील अंकुश यादव, बोरसे किशोर लालचंद, पठान बशीरखा दलशेरखा पाटील सिमाबाई विलास, पाटील निर्मलाबाई मधुकर, पाटील ज्ञानेश्वर विलास, अहिरे सोमा दगा, गढरी धर्मा राघो.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे