आपल खान्देश

गिरड येथे शासकीय जागेवर सौर ऊर्जा प्रकल्पास मंजुरी…

शासकीय जागेवरचा हा जिल्ह्यातील पहिलाच सौर ऊर्जा प्रकल्प आहे, या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा सलग ८ तास वीज उपलब्ध होईल.


झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

गिरड (कैलास सोनवणे) भडगाव तालुक्यातील गिरड गावाच्या १४ एकर शासकीय जागेवर ३.५ मेगावॉटच्या सौर ऊर्जा प्रकल्पास मंजुरी देण्यात आलेली आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पातून गावासाठी वीज मिळणार आहे. तसेच शेतीपंपाला सलग ८ ते १० तास वीजपुरवठा मिळणार आहे. शासकीय जागेवरचा हा जिल्ह्यातील पहिलाच सौर ऊर्जा प्रकल्प आहे. 

आधुनिक मानवी जीवनात आज विजेला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वीज आवश्यक आहे. आजपर्यंत प्रामुख्याने आपण पारंपरिक पद्धतीने औष्णिक तसेच जलविद्युत निर्मिती करत आलो आहोत. कोळशापासून वीज निर्मिती करताना हळू-हळू कोळशाचे साठे कमी होत आहेत. त्याचबरोबर कोळशापासून वीज निर्मिती करताना मोठ्या प्रमाणावर प्रदूषणही होत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आता जलविद्युत प्रकल्पाकडून ही वीज निर्मितीची मोठी अपेक्षा धरता येत नाही.

विजेची दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढणारी गरज भागविण्यासाठी आता पवन ऊर्जा व सौर ऊर्जा यासारखे वीज निर्मितीचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पवन ऊर्जा व सौर ऊर्जा ही निसर्गाकडून आपल्याला मिळालेली देणगीच आहे, महाराष्ट्रातील शासकीय जागांवर ४५० मेगावॉटचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून जळगाव जिल्ह्यातील गिरड (ता. भडगाव) येथे शासकीय जागेवर पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. कल्याण येथे राहणारे गिरड येथील रहिवासी भानुदास अर्जुन पाटील यांच्या संकल्पनेतून या योजनेचे काम मार्गी लागत आहे. १४ एकर जागेवर ३.५ मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पास मंजुरी देण्यात आल्याची माहिती महावितरणमार्फत देण्यात आली आहे.

या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा सलग ८ तास वीज उपलब्ध होईल. याकामी गिरड ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सुनील जाधव, भडगाव वीज वितरणचे उपअभियंता रवींद्र राऊळ, उपअभियंता योगेश पाटील, विवेक जोशी, ए. एस. पाटील, मुख्य अभियंता कैलास हुमने, अधीक्षक अभियंता राजेंद्र मार्के, जळगाव तहसीलदार लोखंडे यांचे सहकार्य लाभत आहे. शेतीपंपाला सलग दहा तास वीजपुरवठा व ज्या गावात वीज निर्मिती होते, तेथे २४ तास वीजपुरवठा दिला जातो, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे