महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण सोहळा संपन्न

मुंबई :- भारताच्या ७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यासह त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण आणि राज्यशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्य मंडळी उपस्थित होते. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली.

असीम त्याग, समर्पण आणि अनेकांचे हौतात्म्य यातून साकारलेला भारत अजून बलशाली करुया. लाख आव्हाने येवोत, त्यांना परतवून हिंमत बाळगूया, त्यासाठी आपण वज्रमूठ करुया, असे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या प्रजासत्ताकाचे हे वैभव मिरवतानाच आपण येणाऱ्या पिढ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदेल यासाठी निर्धार करुया असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

१२ नोव्हेंबरला मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर २ डिसेंबरला उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. तेव्हापासून उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर बसूनच राज्याचा कारभार हाताळत आहेत. या काळात सर्व प्रशासकीय चर्चा, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळाच्या बैठकांना उद्धव ठाकरे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच हजेरी लावत होते. गेल्याच महिन्यात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनालाही ते उपस्थित राहू शकले नव्हते. त्यानंतर उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी यांनी बोलवलेल्या बैठकीलाही ते गैरहजर होते. इतका काळ मुख्यमंत्री दिसत नसल्याने विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली होती. तसेच आज . मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे