आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

पाचोरा तालुक्यातील बदरखे येथील पेमबुवा यात्रेत आढळला एका तरुणाचा मृत्यूदेह..

पाचोरा तालुक्यातील बदरखे येथील पेमबुवा महाराजाची यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम सुरु असताना तमाशा बघण्यासाठी आलेला हनुमंत खेडा तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर येथील मनोज ज्ञानेश्वर निकम वय 30 या युवकाचा मृतदेह तमाशा सुरू असलेल्या ठिकाणाहून काही अंतरावर आज सकाळी आढळून आल्याने एकच खडबळ उडाली.

सदर मयत तरुणाच्या मृत्यूची प्राथमिक माहिती मृत मनोज निकम याचे काका नंदकिशोर पाटील यांनी नगरदेवळा पोलीस स्टेशनला दिली असता लागलीच नगरदेवळा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी लागलीच घटनास्थळी जाऊन सदरील जागेच्या पंचनामा करून मृत्यूदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे शव विच्छेदनासाठी पाठवला असून सदरील तरुणाच्या शरीरावर काही ठिकाणी मार लागल्याचे आढळून आल्यामुळे सदरील मृत्यूदेह जळगाव शासकीय रुग्णालय येथे पाठविले असल्याची माहिती मिळाली सदरील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करत आहेत परंतु तरुणाचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला हे अजून स्पष्ट झाले नाही परंतु ह्या तरुणाच्या मृत्यू मुळे परिसरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे