गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी घटना, विनयभंगाचा गुन्हा दाखल..!

गेल्या काही वर्षापासून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना प्रत्येक व्यक्ती देव समजत आहे पण गेल्या काही महिन्यापासून याच डॉक्टरी पेशाला काळिमा फासणाऱ्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. उपचारांच्या नावाखाली एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना पुण्यातील पद्मावतीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी पद्मावती येथील डॉ. पिंगळे क्लिनीक येथे रात्री पावणे अकराच्या सुमारास घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहकारनगर येथे राहणाऱ्या एका तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन डॉ. हनुमंत पिंगळे (रा. निर्मल पार्क सोसायटी, पद्मावतीनगर) याच्यावर आयपीसी 354, 354ड नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर परिसरात राहणाऱ्या तरुणीला ताप आल्याने तसेच बरे वाटत नसल्याने ती आरोपीच्या डॉ. पिंगळे क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी हनुमंत पिंगळे याने तरुणीला तपासण्याच्या बहाण्याने अश्लील चाळे केले. तसेच तिच्या शरीराला स्पर्श करुन तरुणीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे