आपल खान्देश

संजयदादा गरुड यांच्या नेतृत्वात आचार्य विद्या विकास पॅनलची स्थापना.

दिलीप राजपूत प्रतिनिधी

शेंदुर्णी (झूम मराठी) दी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लि. शेंदुर्णी या संस्थेची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक सन २०२३ २०२८ ही दि.३१/१२/२०२३ रविवार रोजी होऊ घातलेली आहे. या निवडणुकीत संस्थेचे चेअरमन मा.श्री.संजयदादा गरुड यांच्या नेतृत्वात “आचार्य विद्या विकास पॅनल” ची स्थापना झालेली आहे. या पॅनलचा प्रचार नारळ शेंदुर्णी येथील काशीविश्वेश्वर (विजदेवळी) मंदिर येथे दि. २१ रोजी पॅनलचे सर्व उमेदवार व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

या प्रसंगी आचार्य विद्या विकास पॅनलचे सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार संजय भास्करराव गरुड, सागरमल मिश्रीलाल जैन, किशोर मानसिंग पाटील, रघुनाथ नीलकंठ पाटील, भीमराव शामराव शेळके, राजेंद्र भीमराव शेळके तसेच वि.जा.भ.ज. मतदारसंघातील उमेदवार उत्तमसिंग उमेदसिंग पाटील यांचेसह शेंदुर्णी फ्रुटसेल सोसायटीचे संचालक दिनेश पाटील, प्रा. चंद्रशेखर पाटील, अशोक मराठे, जयपाल गरुड आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे