मुंबई (सुचिता जगताप) वेगवेगळ्या क्षेत्रातील मुस्लिम महिलांची इंटरनेटवर बदनामी करण्यात येत आहे. मुस्लिम महिलांचे फोटो ऑनलाईन बुलीबाई ॲपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या बुलीबाई ॲप ॲपवर महिलांसंदर्भात आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात येत असल्याची तक्रार अनेक ठिकाणांवरून करण्यात आली होती. या प्रकरणी सायबर पोलिसांनी उत्तराखंडमधील एका 21 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. उत्तराखंडमधील ही आतापर्यंतची दुसरी अटक आहे तर ‘बुली बाई’ अॅपवर सुरू असलेल्या तपासासंदर्भात हि तिसरी अटक आहे. मुंबई सायबर पोलिसांच्या तीन सदस्यीय पथकाने ही अटकेची कारवाई केली आहे. या प्रकरणी आता 18 वर्षीय श्वेता सिंग या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे.
श्वेताचाही काही ट्विटर हँडल वापरून ट्विटरवर बुली बाई अॅपच्या प्रचार करण्यात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता. इंटरनेटवर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे छायाचित्रे वापरणे आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी बुली बाई अॅप्लिकेशन निर्माता व ट्विटर हॅण्डल चालवणाऱ्या विरोधात पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला होता.
समाजमाध्यमंवरील महिलांची बदनामी करणाऱ्या बुली-बाई ॲप प्रकरणात दिल्ली आणि मुंबईतील पोलिसांनी आतापर्यंत गुन्हा दाखल केला आहे. बुली-बाई ॲपवर समाजमाध्यमांवर असलेल्या मुस्लिम महिलांची छायाचित्रे ‘बुली-बाई आॅफ द डे’ म्हणून प्रसारित केली जात होती. मुस्लिम महिलांची छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर दिवसभर आक्षेपार्ह टिका टिप्पणी त्यावर केली जात होती. आतापर्यंत 100 मुस्लिम महिलांना लक्ष करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेलनं ट्विटरवर लिहिलं होतं.
कारण ‘बुली बाई’शी संबंधित 3 ट्विटर हँडलची माहिती पोलिसांना मिळाली. या अॅप्लिकेशनची तक्रार आल्यानंतरच मुंबई पोलिसांनी बुली बाय अॅप्लिकेशन तयार करणाऱ्या डोमेन गुगलला पत्र लिहून हे अॅप्लिकेशन बंद करण्याचे निर्देश दिले होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा