पाचोरा भडगावाच्या ग्रामीण भागाच्या रस्ते व पुलांच्या विकास कामासाठी तब्बल 43 कोटीचा निधी मंजूर..
- दिलीप जय परदेशी.
पाचोरा (झूम मराठी) नागपूरच्या हिवाळी अधवेशना दरम्यान पुरवणी बजेट अंतर्गत पाचोरा भडगाव मतदार संघात रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याने सुमारे ४३ कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यात पाचोरा तालुक्यातील रस्ते विकासासाठी २७ कोटी ४५ लाख रुपयांच्या कामांना, तर भडगाव तालुक्यासाठी १५ कोटी ४३ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शासनाने पाचोरा भडगाव मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी मंजूर केला आहे. यात शिंदाड-पिंपळगाव रस्ता, कजगाव-नागद रस्ता, गिरड-पाचोरा रस्ता, शिंदाड-पिंपळगाव रस्त्यावरील पुलाचे बांधकाम लोणवाडी ते बांबरूड रस्ता, घुसडीं ते नगरदेवळा, शेवाळे ते खडकदेवळा रस्ता बांबरूड खुर्द अंतुर्ली, सारोळा ते मोंढाळा रस्ता, वाणेगाव-राजुरी रस्ता, भातखंडे ते पाचोरा रस्ता, मोंढाळे ते आर्वी रस्ता, खडकदेवळा ते शेवाळे रस्तापिंपळगाव हरेश्वर ते बहुलखेडा रस्ता, पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी रस्ता, वानेगाव ते वाडी रस्ता, शिंदाड ते पिंपरी रस्ता, उपलखेडा ते बाळद रस्ता, लासगाव ते कुरंगी रस्ता, लासगाव ते माहेजी रस्ता, दहिगाव ते सामनेर रस्ता, तारखेडा ते निंभोरा रस्ता, तर भडगाव तालुक्यातील वाडे ते गोंडगाव कनाशी रस्ता, पारोळा भडगाव रोड, खेडगाव- जोहार्डी रस्ता, बात्सर-लोण कनाशी रस्ता, आडळसे ते खेडगाव रस्ता, लोण ते गोंडगाव रस्ता, पांढरध ते निंभोरा रस्ता, गोंडगाव ते बांबरूड फाटा रस्ता, जोहरडी ते बहाळ रस्ता, सावदे ते कोळगाव रस्ता, वडदे-कोठली रस्ता, गोंडगाव ते पासीं रस्ता, निंभोरा ते निंभोरा वस्ती रस्ता अशा विविध रस्त्यांचा समावेश असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
यावेळी जळगाव जिल्हा प्रमुख मनोहर पाटील, बाजार समिती सभापती गणेश पाटील, माजी नागराध्यक्ष संजय गोहिल, पाचोरा शहरप्रमुख किशोर बारावकर, माजी जि प सदस्य पदमबापू पाटील, बंडू चौधरी, उपस्थित होते.




