Pachora News | शिशु मृत्यू प्रकरणी वृंदावन हॉस्पिटलाची चौकशी करून, गुन्हा दाखल करावा डीवायएसपी यांना स्मरणपत्र देऊन, एकलव्य संघटना आक्रमक..!
शहरातील वृंदावन हाॅस्पिटलमध्ये १५ दिवसाच्या बालिकेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर वाघ यांनी १४ नोव्हेंबर रोजी रात्री तक्रार अर्ज देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पंधरा दिवस उलटूनही अजून पर्यंत कोणतीही चौकशी व कार्यवाही न झाल्यामुळे आज रोजी डी वाय एस पी पाचोरा यांना स्मरणपत्र देऊन एकलव्य संघटनेने आंदोलनाचा दिला इशारा.
पाचोरा शहरातील आदिवासी समाजाचे पंधरा दिवसाचे बाळ उपचार करताना मृत्यू पावलेल्या बाळाची अवहेलना करून विटंबना झाल्यामुळे संबंधित वृंदावन हॉस्पिटल पाचोरा यांचे संचालक डॉ. निळकंठ पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत वरील विषयाबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला 14/11/2023 रोजी लेखी तक्रार दिली असून जिल्हा चिकित्सालय जळगाव तसेच पाचोरा ग्रामीण रुग्णालय जिल्हाधिकारी एस पी सो जळगाव यांना प्रति रवाना केल्या होत्या त्या अनुसरून अजूनही चौकशी झाली नाही त्या अनुषंगाने दिनांक 17/11/202 रोजी एकलव्य संघटनेने धरणे आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनात आमदार किशोर पाटील यांनी सुद्धा भेट दिली तसेच डी वाय एस पी पाचोरा पोलीस स्टेशनचे पी आय यांनी सुद्धा आश्वासन दिले की पंधरा दिवसात चौकशी करून वृंदावन हॉस्पिटलचे संचालक निळकंठ पाटील यांच्यावर कार्यवाही करू आमदार डी वाय एस पी साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते त्यानंतर पंधरा दिवस उलटूनही अजून पर्यंत कोणतीही चौकशी व कार्यवाही न झाल्यामुळे आज दिनांक 8/12/2023 रोजी डी वाय एस पी पाचोरा यांना स्मरणपत्र एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर वाघ संजय सोनवणे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनवणे युवा जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव जिल्हा सचिव रमेश वाघ तालुका अध्यक्ष पाचोरा रमेश मोरे तालुकाध्यक्ष भडगाव यांनी दिले निवेदनात पुढे असे म्हटले आहे की आदिवासी समाजावर अन्याय होत असून डॉक्टर निळकंठ पाटील यांच्यावर अनुसूचित जाती जमातीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास एकलव्य संघटन डी वाय एस पी ऑफीस समोर आंदोलन करून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात रास्ता रोको करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.


