आपल खान्देशकृषीवार्ताब्रेकिंग

CCI Centre : उत्तर महाराष्ट्रातील पहिले सीसीआय केंद्र शेंदुर्णीत; पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या रांगा….

कापसाला प्रतिक्विंटल सात हजार २० चा भाव देण्यात आला.

  •  दिलीप जय परदेशी

शेंदुर्णी येथील गोपाला जीनिंगहे खानदेशातील पहिले सीसीआय केंद्र सुरू झाले असून, कापसाला प्रतिक्विंटल सात हजार २० चा भाव देण्यात आला. आज मंगळवारी पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत.

बहुलखेडा येथील शेतकरी अंकुश लक्ष्मण पवार यांच्या कपाशीच्या ट्रॅक्टरची पूजा करून व ‘सीसीआय’चे प्रभारी अधिकारी गजानन पिसे यांनी पवार यांना रूमाल, टोपी घालून कापूस खरेदीस प्रारंभ केला, या वेळी पाचोरा येथील प्रभारी अधिकारी योगेश थारनेरकर, बोदवड येथील प्रभारी अधिकारी प्रवीण पाटील उपस्थित होते. तसेच, गावातील गोविंद अग्रवाल, भाजपचे ज्येष्ठ नेते कडोबा माळी, नामदेव बारी, नीलेश थोरात, शंकर बारी, पंकज सूर्यवंशी, मनोज अग्रवाल, नितीन अग्रवाल, सुनील अग्रवाल, युवराज सूर्यवंशी उपस्थित होते. कापूस खरेदीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्याने रजिस्ट्रेशन करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून त्याचा वेळ वाचेल, तसेच आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक असावा आणि बँकेला आधार लिंक असणे गरजेचे आहे. तीन दिवसांत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होतील. तसेच, सात-बारावर चालू वर्षात कपाशीचा पीकपेरा असणे आवश्यक आहे. कपाशीचे माइश्‍चर ८ ते १२ टक्के असावे, अशी माहिती शेंदुर्णी केंद्राचे प्रभारी अधिकारी पिसे यांनी दिली. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून आपला माल सीसीआय केंद्रावर खरेदीसाठी आणावा, असे आवाहन करण्यात आले.

बहुलखेडा येथील शेतकरी अंकुश लक्ष्मण पवार यांच्या कपाशीच्या ट्रॅक्टरची पूजा करून व ‘सीसीआय’चे प्रभारी अधिकारी गजानन पिसे यांनी पवार यांना रूमाल, टोपी घालून कापूस खरेदीस प्रारंभ केला.

या वेळी पाचोरा येथील प्रभारी अधिकारी योगेश थारनेरकर, बोदवड येथील प्रभारी अधिकारी प्रवीण पाटील उपस्थित होते. तसेच, गावातील गोविंद अग्रवाल, भाजपचे ज्येष्ठ नेते कडोबा माळी, नामदेव बारी, नीलेश थोरात, शंकर बारी, पंकज सूर्यवंशी, मनोज अग्रवाल, नितीन अग्रवाल, सुनील अग्रवाल, युवराज सूर्यवंशी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे