आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

Pachora News | पाचोऱ्यात जागतिक दिव्यांग दिवस उत्साहात साजरा..

  •  दिलीप जय परदेशी

पाचोरा (झूम मराठी वृत्त) आज जागतिक दिव्यांग दिन, हा दिवस दरवर्षी ३ डिसेंबर १९९२ पासून जगभरात साजरा केला जातो. अपंग लोकांना त्यांच्या हक्कांविषयी सांगणे आणि इतर लोकांना त्याची जाणीव करून देणे हा त्याचा उद्देश असून आज पाचोरा शहरातील तहसील कार्यालयातील प्रांगणात झालेल्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने आज जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला.

 

यावेळी अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके, पोलीस उपनिरीक्षक योगेश गगणे, नायब तहसीलदार बी. डी पाटील, दिव्यांग कक्ष अधिकारी आबासाहेब काशिनाथ महाले. माजी सभापती बन्सीलाल पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष दीपक माने, प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश गोंड, उपाध्यक्ष राजू अहिरे, शहराध्यक्ष शौकत तकारी, उपाध्यक्ष अनिल लोणारी, महिला तालुका अध्यक्ष संगीता ठाकूर यांच्यासह असंख्य दिव्यांग बांधव महिला उपस्थित होत्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना युडीआय कार्ड मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पाचोरा शहरातील प्रवीण चव्हाणके यांनी तहसीलदार कार्यालयातील दिव्यांगांच्या विविध योजनांची माहिती दिली व शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांनी दिव्यांग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व विविध समस्या सोडवण्याची ग्वाही दिली .माजी सभापती बन्सीलाल बापू पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

  • आज जागतिक दिव्यांग दिन.

हा दिवस दरवर्षी ३ डिसेंबर १९९२ पासून जगभरात साजरा केला जातो. अपंग लोकांना त्यांच्या हक्कांविषयी सांगणे आणि इतर लोकांना त्याची जाणीव करून देणे हा त्याचा उद्देश आहे. समाजातील सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींचे हक्क आणि कल्याण साधलं जावं, या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. विशेष म्हणजे एकूण दिव्यांग लोकसंख्येपैकी तब्बल 80 टक्के लोक विकसनशील देशांमध्ये राहतात. जगभरातील एकूण दिव्यांगांमध्ये लहान मुलांची संख्या 100 दशलक्षाहून अधिक आहे. आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक यांसारख्या जागतिक समस्यांचा मोठा परिणाम दिव्यांग लोकांवर होत असतो.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे