आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसखी

Crimes | पाचोरा अल्पवयीन मुलाशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेऊन व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत केली ही मागणी…..!

'व्हिडीओ व्हायरल'ची धमकी देत पैशाची मागणी, महिलेसह चार जणांविरुद्ध गुन्हा...

पाचोरा अल्पवयीन मुलाशी शारीरिक संबंध करून व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार पैशाची मागणी करून पीडित मुलाच्या वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी महिलेसह चार जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

अल्पवयीन पीडित मुलगा हा त्याच्या पाचोरा तालुक्यातील मूळ गावी मार्च २०२०ला लॉकडाऊन काळात त्याच्या मित्राकडे राहायला आला होता. यावेळी मित्राच्या आत्याने त्यास एकांतात गाठून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले व तसा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेने पीडितमुलास वारंवार छळ करीत तीन वेळा प्रत्येकी ५० हजारांची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर व्हिडीओ व्हायरल करीन, अशी धमकी दिली. यामुळे या पीडित मुलाने महिलेस तीन वेळेस प्रत्येकी ५० हजार रुपये दिले. 

पीडित हा कुटुंबासह याच गावात चुलत बहिणीच्या लग्नासाठी आला असता महिलेने त्यास पुन्हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यावेळी या मुलाने त्याच्या वडिलांना ही कहाणी सांगितली असता पीडित मुलाच्या वडिलांनी जाब विचारला. यावरून मुलाच्या वडिलांना शिवीगाळ करीत मारहाण केली. मुलाच्या फिर्यादीनुसार महिलेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे