गुन्हेगारीब्रेकिंग

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर ? तळोजातून बदलापूरला जाताना काय घडलं…

 

बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची बातमी समोर आली आहे. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असून एक पोलीस जसमी झाल्याची माहिती मिळत आहे. आज पहाटे ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन हा प्रकार केल्याच मागितले जात आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्याचा एन्काउंटर केल्याने अक्षयया मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही घटना ठाण्याच्या हद्दीत पडली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अक्षय शिंदे याची बदलापूर बलात्कार प्रकरणात चौकशी सुरु आहे. एसआयटीकडून त्याची चौकशी सुरु आहे. त्याला कोठाग्रीही देण्यात आली होती. त्यामुळे त्याला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र, आणखी एका गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी बदलापूर पोलीस आज तळोजा येथे आले होते. सकाळी 5.30 वाजता पोलीस तळोजा कारागृहात पोहोचले होते. अक्षयचा ताबा घेऊन त्याला बदलापूरकडे नेत असताना ठाण्याच्या हद्दीत अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सेल्फ डिफेन्ससाठी गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र, पोलिसांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नाही.

या झटापटीत एका पोलिसालाही गोळी लागल्याने हा पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसाची प्रकृती गंभीर आहे. अक्षयने व्हॅनमध्येच पोलिसांवर गोळीबार केला. त्याने तीन राऊब फापर केले, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला, त्याने पोलिसांच्या पायांवर गोळीबार केला. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. कळवा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अक्षयने स्वतःवर गोळी झाडली की आणखी काही दुसर आहे. त्याला कोणी गोळी घातली की आणखी काही आहे? याची सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यानी केली आहे. तर, या प्रकरणाचे धागेदोरे आरएसएसपर्यंत गेले आहेत. या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. त्यामुळे पुराने नष्ट करण्याचा हा प्रकार तर नाही ना? असा संशय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. मात्र, आपण कोणत्याही निष्कर्षापर्यंत येणार नसल्याचंही वडेट्टीवार यांनी महटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे