आपल खान्देश

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून बाजार समितीत कष्टकरी, श्रमजीवी वर्गाला दिवाळीचा फराळ वाटप


पाचोरा – भडगाव मतदार संघांचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणारे कष्टकरी,श्रमजीवी कामगार, राखणदार यांना दिपावली निमित्त दिवाळी फराळाचे वाटप करून गोरगरीब लोकांसमवेत दिवाळी साजरी केली.

यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, पाचोरा -भडगाव बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील, व्यापारी संचालक मनोज शेठ सिसोदिया, बाजार समितीचे माजी उपसभापती सुभाष अग्रवाल, उद्योजक प्रमोद सोनार,  प्रमोद ललवाणी, कल्पेश संघवी, माजी नगरसेवक बापु हटकर तसेच बाजार समितीचे कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.

पाचोरा -भडगाव तालुक्यातील राजकीय नेतेमंडळी पैकी सर्वाधीक सर्वच स्तरातील जनतेचे अफाट प्रेम व लोकप्रियता लाभलेले नेते व मॅग्नेटीक पर्सनॅलिटी म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील यांची संपूर्ण जिल्हयात ख्याती असून जातीपातीच्या पलीकडे जात सर्वसामान्य उपेक्षीत समाजाला बरोबर घेत दिवाळी फराळ वाटप करून साजरी केल्याबद्दल उपस्थित सर्व कष्टकरी वर्गातील कामगारांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपले बद्दल दाखविलेली सद्‌भावना व समाधान व्यक्त केले..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे