गुन्हेगारी
सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार
पहूर (जळगाव) : पहूर (ता. जामनेर) शहरात राहणाऱ्या सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
पहूर शहरात वास्तव्यास असलेली पिडीत सहा वर्षीय मुलगी आई- वडीलांसह राहते. शनिवारी (१७ एप्रिल) दुपारी बाराच्या सुमारास पिडीत मुलगी शौचालयासाठी गेली होती. त्यावेळी गावातील अकबर युसूफ तडवी (वय ४०, रा. खंडेरावनगर पहूरपेठ) याने फुस लावून मुलीला उचलून नेले. गावातील निर्जळ ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पिडीत मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर पहूर पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अकबर तडवी याच्याविरूध्द बाल लैगिंक अत्याचार अन्वये पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनि अमोल देवढे करीत आहे.



