महाराष्ट्र

‘बाळू लोखंडे, सावळज’ खुर्ची मँचेस्टरला गेली कशी ?

सांगली जिल्ह्यातील सावळज (ता. तासगाव) येथील मंडप व्यावसायिक बाळू लोखंडे यांच्या लोखंडी खुर्चीची चर्चा सातासमुद्रापार झाली असून जेष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. बाळू लोखंडे यांची खुर्ची सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून या खुर्चीचा मँचेस्टर प्रवास देखील तितकाच रंजक आहे .

‘बाळू लोखंडे, सावळज’ असे या खुर्चीवर नाव लिहिले आहे. सुनंदन लेले यांनी त्याच लोखंडी खुर्चीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. काही तासातच मराठी मातीतल्या बाळूच्या खुर्चीची जोरदार चर्चा झाली आणि हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. सावळज येथील मंडप व्यावसायिक बाळू लोखंडेंची लोखंडी खुर्ची तब्बल ७ हजार ६२७ किलोमीटरचा प्रवास करून इंग्लंडमधील मँचेस्टरच्या हाॅटेलात कशी पोहोचली ? याचा प्रवास देखील तितकाच मनोरंजक आहे

.सामान्य कुटुंबातील बाळू लोखंडे यांनी १५ वर्षापूर्वी स्वत:चा मंडप उभारणी व सजावटीचा व्यवसाय सुरू केला होता. बसून जेवायला काही ठिकाणी अडचणी येत असल्याने काही कार्यक्रमांत जेवणासाठी टेबल व खुर्चीची मागणी व्हायला लागली. मंडप व्यवसायास जोडधंदा म्हणून बाळू यांनी केटरिंगचे साहित्यही आणले. व्हायरल झालल्या खुर्चीच्या प्रकारच्या खुर्च्या त्यांनी १५ वर्षापूर्वी हुबळी (कर्नाटक) येथून घेतल्या होत्या. एका खुर्चीचे वजन तब्बल १३ किलो होते. वजनाने जड लोखंडी खुर्च्या नंतर फायबर खुर्च्या आल्यावर हाताळण्यासही जड वाटू लागल्या.

लोखंडी जड खुर्च्यांच्या मानाने फायबर खुर्च्या ह्या हाताळायला सोप्या वाटत असल्याने काही वर्षापूर्वी त्यांनी काही लोखंडी खुर्च्या सांगलीतील कवठेमहांकाळ येथे भंगारात १० रुपये किलो दराने विकून टाकल्या तर काही खुर्च्या आजही आठवण म्हणून जपून ठेवलेल्या आहेत. भंगारात विकलेल्या या खुर्च्या पुढे मुंबईपर्यंत गेल्या. मुंबई फिरण्यास आलेल्या एका परदेशी व्यावसायिकाने दुर्मिळ खुर्च्या म्हणून त्या विकत घेतल्या आणि त्या लंडनला जाऊन पोहचल्या . बाळू लोखंडेंची लोखंडी खुर्ची पाहिल्यानंतर सुनंदन लेलेंनी थेट बाळू लोखंडेंना फोन केला आणि त्यांच्याशी संभाषण केले. बाळू यांच्या खुर्चीची जोरदार चर्चा होत असून विशेष म्हणजे नवीन मालकाने बाळू यांचे नाव खुर्चीवर अद्याप देखील तसेच ठेवले असल्याने ते देखील कौतुकास पात्र आहेत 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे