आपल खान्देशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

शिवसेनेला जय महाराष्ट्र करत, नंदू शेलार यांनी कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा धरला हाती.

पाचोरा (झूम मराठी) पाचोरा शहरातील शिवसैनिक तथा तरुणांचे नेतृत्व करणारे एन एस गृपचे अध्यक्ष नंदू शेलार यांनी अमोल शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आपल्या कार्यकर्तेसह भाजपात प्रवेश केला आहॆ.

पाचोरा शहरात नंदू शेलार यांनी शहरात सामाजिक व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून व क्रिकेट ट्रनामेंट सामने भरवून आपली छाप उमटवत, युवावर्गाला त्यांनी आकर्षण केले. वॉर्ड क्र 1 मध्ये गरजू लोकांच्या मदतीला धावून येतात. अश्या नंदू शेलार यांच्या सोबत त्यांचे कार्यकर्ते  नितीन शेलार, मुकेश शेलार, बंटी पाटील, गणेश कोळी, सोमनाथ पाटील, पवन परदेशी, सुशांत जाधव, दिनेश पाटील, जॅकी चादवाणी, राहुल मिस्तरी, कुणाल चनाडे, सार्थक पाटील, तुषार राजपूत, भूषण पाटील, ऋषिकेश पाटील, ऋषि प्रजापत, मुकेश राठोड, किरण राठोड, विकास चव्हान यांनी भाजप मध्ये प्रवेश केला असून भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे नंदू शेलार यानां मोठी जबाबदारी देतील असे दिसत आहॆ. भाजप पक्ष घरा घरात नेऊन भाजप साठी तन आणि मनाने काम करून भाजप येत्या निवडणुकीत ताकद कशी वाढेल ते काम करू असे नंदू शेलार बोलतांना म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे