ब्रेकिंग
शाळांची फी वाढ रोखण्यासाठी ठोस शासन निर्णय जारी करा
आमदार डॉ.बालाजी किणीकर यांची शिक्षण मंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांच्याकडे लेखी मागणी
जागतिक आरोग्य संघटनेने वैश्विक महामारी घोषित केलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात टाळेबंदी लागू असल्याने सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत, असे असतांना ही शाळांकडून मनमानी पद्धतीने फी आकारण्यात येत असून ही फी वाढ रोखण्याबाबत शिक्षण विभागाने वारंवार शासन निर्णय पारित करून ही त्याची काटेकोरपणाने अंमलबजावणी होत नसल्याने शिक्षण विभागाने ठोस शासन निर्णय जारी करावा अशी लेखी मागणी शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली आहे. यावर सकारात्मक प्रतिसाद देत मा.मुख्यमंत्री ना. श्री.उद्धवजी ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री ना.श्री.अजित पवार साहेब यांच्याशी चर्चा करून फी वाढ रोखण्यासाठी लवकरच ठोस शासन निर्णय काढण्यात येईल असे आश्वासन आमदार डॉ. किणीकर यांना शिक्षण मंत्र्यांनी दिले.




