आपल खान्देशब्रेकिंगमहाराष्ट्र

शासकीय कार्यालयांमध्ये २८ सप्टेंबर अंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करावे यासाठी दिले निवदन

 


कायद्याच्या जागृतीसाठी 28 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन राज्यात साजरा करावा, असा आदेश असताना मात्र, हा दिन केवळ कागदोपत्रीच साजरा होत असल्याचे दिसून येते. आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन तालुक्यात व्हावा यासाठी आज पाचोरा येथील शासकीय कार्यालयांमध्ये व पाचोरा पोलिस स्टेशन ला २८ सप्टेंबर २०२३ हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्यासाठी आर टी आय महासंघ पाचोरा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

माहिती अधिकार कायद्याबाबत जनजागृती नसल्याने आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करून, जागृतीसाठी सरकार दरवर्षी आदेश काढते.त्या दिवशी शाळा- महाविद्यालयांत वक्तृत्व, निबंध, प्रश्नमंजूषा स्पर्धा, तसेच चर्चासत्रे आयोजित करावीत. त्याचबरोबर स्वयंसेवी व सामाजिक संस्थांमार्फतही भित्तिपत्रके, प्रसार व प्रसाराचे साहित्य तयार करून वाटप करावे, अशी सरकारी पातळीवरील अपेक्षा आहे. मात्र, यातील काहीच होताना दिसत नाही. दरवर्षी सरकारी पातळीवर आदेश निघतो; पण माहिती अधिकार दिन केवळ कागदोपत्री साजरा होत असून, जनजागृती करण्यात सरकार अपयशी ठरत आहे. माहिती अधिकार हे नागरिकांच्या हाती मिळालेले एक प्रभावी शस्त्र आहे. त्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला आहे. नवीन पिढीला तो माहीत नाही. दुर्दैवाने माहितीच्या अधिकाराबाबत पाहिजे तेवढी जनजागृती नाही त्या आदेशाची सर्व शासकीय कार्यालयांनी २८ सप्टेंबर ला माहिती अधिकार दिवस साजरा करून अंमलबजावणी केली पाहिजे. यासाठी पाचोरा शहरातील शासकीय कार्यालयात निवेदन देण्यात आले. मुरलीधर परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आर टी आय महासंघाचे पाचोरा तालुका अध्यक्ष मा. पंकज पाटील व गजानन परदेशी यांनी निवेदन देऊन विनंती केली आहे.

पहा व्हिडीओ येथे 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे