पाचोरा शहरात एकतर्फी प्रेमातून, तरुणीने केला तरुणावर चाकू हल्ला..!
पाचोरा (झूम मराठी) लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या तरुणीने एका तरुणावर चक्क धारदार चाकूने हल्ला चढवत जखमी केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी तरुणावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून जखमी तरुणाच्या बहिणीच्या फिर्यादीवरून तरुणी विरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर हल्ला करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण आहॆ काय?
पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील एका काॅलनीतील येथील पीडित तरुण रहिवाशी यांचे विरुद्ध पाचोरा येथील तरुणीने सन – २०२१ मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. तद्नंतर वेळोवेळी तरूणी मुलाकडे माझ्याशी लग्न कर असा तगादा लावुन धरला होता. दरम्यान मुलाला नोकरी लागली. मात्र तरुणीने ही त्या पीडित तरुणाच्या नोकरीच्या ठिकाणी जावुन त्यास माझ्याशी लग्न कर अशी मागणी करत असल्याची माहिती पीडित तरुणाने बहिणीला दिली होती.
माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला मी जिवंत सोडणार नाही.. असं म्हणत संतप्त तरुणीने तरुणावर धारदार चाकूने हल्ला करून पीडित तरुणास जखमी केल्याची धक्कादायक घटना पाचोरा शहरातील एका कॉलनीत घडली आहॆ
दरम्यान, १५ सप्टेंबर रोजी तरुणाच्या घराबाहेर आरोपी तरुणीने तरुणाला पाहुन शिवीगाळ करत गेट उघडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तरुणाच्या आणि यांनी तरुणी हिस शिवीगाळ करु नकोस असे सांगितले. दरम्यान तरुणी हिने तिच्या जवळील चाकु काढुन मारणार तितक्यात पीडित तरुणाच्या वडिलांनी आरोपी हिचा हात धरला असता तरुणीने हिने त्यांना यांना लाथ मारली. त्यावेळी तरुण याचेसह परिसरातील नागरिकांनी तिला समजविण्याचा प्रयत्न केला.
मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने पुन्हा यास माझ्याशी लग्न कर नाहीतर तुम्हाला सर्वांना जिवंत सोडणार नाही. असे म्हणत असतांनाच हिने तिच्या जवळ असलेल्या धारदार चाकूने मुलाच्या हातावर, मानेवर वार केले. या झटापटीत आरोपी मुलगी हिस आवरण्यासाठी गल्लीतील एक व्यक्ती गेले असता त्यांना देखील चाकुने हाताला जखम झाली. घटनास्थळावरून पीडित मुलाचे आई व वडील हे पोलिस स्टेशनला गेल्यानंतर, दरम्यान पोलिसांच्या गाडीचा सायरनचा आवाज येताच आरोपी ही घटनास्थळावरुन निघुन गेली. पीडित तरुण यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास परिवाराने येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान १६ सप्टेंबर रोजी पीडित तरुण यांची बहिण व वडील यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत आरोपी तरुणी हिच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपी हिस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे हे करीत आहे.



