ब्रेकिंग

Android | स्मार्टफोन मध्ये असणारी अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टिम याच पट्ठ्याने बनवलीय.


.

हा आहे ‘अँडी रुबिन’, तुम्ही ही पोस्ट जर तुमच्या स्मार्टफोन वरून वाचत असाल तर याचे आभार मानायला विसरू नका. कारण त्या स्मार्टफोन मध्ये असणारी Android ही ऑपरेटिंग सिस्टिम याच पट्ठ्याने बनवलीय. त्याचं झालं असं की, अँडीला रोबोटिक्स क्षेत्राची अतिशय आवड होती, सुरवातीला तो Carl Zeiss या सुप्रसिद्ध कॅमेरा लेन्स कंपनीसाठी काम करत होता. डिजिटल कॅमेरा साठी एखादी ऑपरेटिंग सिस्टीम असावी असं त्याला वाटू लागलं. २००३ साली काही साथीदारांना सोबत घेऊन त्याने एक कंपनी स्थापन केली आणि या ऑपरेटिंग सिस्टीम वर काम सुरु केलं. ही ऑपरेटिंग सिस्टीम तयार झाली, droid म्हणजे रोबोट त्याच्या रोबोटिक्स क्षेत्रात असणाऱ्या आवडीमुळेच त्याने स्वतःच्या नावाच्या पुढे Droid जोडलं आणि तयार झालं Android हे नाव. जी ऑपरेटिंग सिस्टीम तयार झाली त्याचा वापर डिजिटल कॅमेरापेक्षा मोबाईल साठी होऊ शकतो असं त्यांना वाटू लागलं आणि त्यांनी कामाचा फोकस तशा पद्धतीने वळवला. याकडे लक्ष गेलं ते सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या बलाढ्य ‘गूगलचं’. खरंतर या काळात बोलबाला होता तो ब्लॅकबेरी आणि आयफोनचा त्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी गुगलही चाल केली. ऑगस्ट २००५ साली गुगलने Android Inc ही कंपनी विकत घेतली. अर्थात हा अँडी रुबीन आणि त्याची टीमही गुगलसाठी काम करू लागले.

भारतात त्यावेळी चायना , नोकिया फोनचा बोलबाला असतानाच, अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टीम असणारा HTC चा Dream नावाचा मोबाईल हा पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन २००८ साली लाँच करण्यात आला. लवकरच Google ने ही ऑपरेटिंग सिस्टीम Open Source केली, म्हणजे वापरासाठी आणि डेव्हलोपमेंट मोफत देण्यास सुरवात केली. त्यामुळे अनेक मोबाईल कंपन्या या ऑपरेटिंग सिस्टीम कडे आकर्षित झाल्या. अल्पावधीतच नवनवीन अँप्स येऊ लागले, कपकेक, हनीकोंब , आईस क्रीम सँडविच, किटकॅट असे खाद्यपदार्थांच्या नावाचे अँड्रॉइड version बाजारात येऊ लागले आणि २०१२-२०१३ मधेच या अँड्रॉइड ने मार्केट मारलं.

रोजच्या वापरातल्या अनेक गोष्टी जसे की, डिजिटल कॅमेरा, स्कॅनर , इंटरनेट कॅफे, पुस्तकं, कॉम्पुटर अशा अनेक गोष्टींना पर्याय म्हणून अँड्रॉइड स्मार्टफोन लोकप्रिय झाला. आज अँपल च्या iphone हा पर्याय असतानाही जवळपास ७०% मार्केट शेअर हा अँड्रॉइडचा आहे. तब्बल ४० कोटी अँड्रॉइड user आहेत यावरून त्याची लोकप्रियता लक्षात येईल.

अन्न पाणी आणि निवारा या मूलभूत गरजांमध्ये स्मार्टफोनही मूलभूत गरज कधी झाला समजलंच नाही. अशा रीतीने जग बदलवून टाकणाऱ्या अँडी रुबीनचे आभार आणि आणि माझ्यासारख्या Android Developer कडून त्याला एक सलाम. आयफोन साठी स्टीव्ह जॉब्स आपल्याला आठवतो मात्र Android साठी अँडी रुबिन तसा अपरिचितच , आणि त्यासाठी म्हणूनच हा एक प्रयत्न.


– रोहित पवार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे