ब्रेकिंगमहाराष्ट्र

कोपर्डी प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगत असलेला मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेंची आत्महत्या..


अहमदनगर  न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जरी कोपर्डीतील आरोपींना फाशी झाली नाही तरी देवाजवळ न्याय होतो, अशा भावना कोपर्डीतील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेच्या आत्महत्येनंतर कोपर्डीतील नागरिकांनी व्यक्त केल्या. कोपर्डीमध्ये १३ जुलै २०१६ रोजी १५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. गावातीलच तीन युवकांनी मिळून तिचा खून केला होता. त्यानंतर न्यायालयाने तिघांनाही याप्रकरणी दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. परंतु आरोपींनी या शिक्षेला वरील न्यायालयात आव्हान दिल्याने त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नव्हती. हे सर्व आरोपी पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

कोपर्डी निर्भया अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी कोपर्डी गावात अनेक वेळा आंदोलने झाली. आताही जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना कोपर्डीतूनही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यामध्येही या आरोपींनी तातडीने फाशी द्यावी, ही मागणी करण्यात आली होती. त्यादरम्यानच आज सकाळी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मुख्य आरोपी जितेंद्रने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे