पाचोऱ्यात सुनेने गुंगीचे औषध देऊन, पती,सासू सासऱ्यानां केली झोपेतच बेदम मारहाण!
पाचोरा लाईव्ह
पाचोरा, दि.२८ नवविवाहितेने बापाच्या मदतीने पतीसह सासू सासऱ्यास गूंगीचे औषध देऊन झोपेतच बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना २८ रोजी मध्यरात्रीच्य सुमरास पाचोरा कोंडवाडा गल्लीत घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील अर्जुन पाटील (५२), (रा. कोडवाडा गल्ली, पाचोरा) यांचा मुलगा राहुल याचा पल्लवी उर्फ कडूबाई हिच्याशी ९ मार्च रोजी २०२२ रोजी (पाथरी ता.पाथरी जि.परभणी) येथे मंदीरात आंतरजातीय विवाह झाला होता. नवविवाहितेचे मुळ गाव (हसले साबलेवाडी मदनापुर रोड पोस्ट खामगाव भारखेडा जि.जालना) असे आहे. २५ मार्च रोजी सुन पल्लवी हिने तीचे वडील साहेबराव सांडू म्हसके यांना तीला भेटण्यासाठी पाचोरा आले असता सुन हिने वडिलां सोबत त्यांच्या गावी जाण्याकरीता बोलती असता सुन हिस तिच्या वडिलां सोबत जाण्यास नकार दिला असता सुन पल्लवी व तिचे वडील साहेबराव सांडू म्हसके यांना राग आल्याने दोघांनी आपसात त्यांचे भाषेत चर्चा करून यांना आता सोडायचे नाही असे म्हणुन सुन पल्लवी हिने वडील साहेबराव सांडू म्हसके हे फिर्यादी कडे मुकामी राहीले असता २७ मार्च रोजी रात्री नेहमी प्रमाणे ८:३० वा.दरम्यान जेवण करून मुलगा राहुल व सुन पल्लवी असे त्याच्या खोलीत फिर्यादी तसेच पत्नी व साहेबराव खोलीत फिर्यादी तसेच पत्नी व साहेबराव म्हसके हे पुढच्या खोलीत बसलेले असतांना सुन पल्लवी हिने सासऱ्यास पाण्याची बाटली दिली. सासरा बाटलीतील पाणी पिल्यानंतर त्याची पत्नी विजयाबाई बाटलीतील पाणी पिल्यानंतर त्याची पत्नी विजयाबाई अर्जुन पाटील यांना गुंगी आल्याने झोपुन गेले. त्यानंतर २८ रोजी रोजी रात्री १:३०वा सुमारास अचानक जाग आल्याने सुनेचे वडील साहेबराव सांडू म्हसके यांनी त्यांच्या हातातील लोखंडी गजाने सासऱ्यास मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी सासरे अर्जुन पाटील यांनी डाव्या हाताने गज अडविल्याने डाव्या हाताला दुखापत झाली. तसेच चेहरावर हाता पायावर गजाने मारहाण करन दुखापत केले त्याचवेळी पत्नीस आरडा ओरडचा आवाज आल्याने झोपेतून उठल्याने पत्नीच्या डोक्यावर मारून दुखापत केली. मुलगा राहुल याचा कुठलाही आवाज येत नसल्याने त्याचे खोलीत अर्जुन पाटील यांनी जाऊन पाहिले असता मुलगा राहुल याला सुध्दा चेहऱ्यावर लोखंडी गजाने मारहाण केल्याने त्याचा जबडा फाटलेला दिसून आला. लोकांना बोलावून आणले असता लोकांनी अर्जुन पाटील तसेच पत्नी व मुलगा राहुल अशांना उचलून खाजगी वाहनात टाकून पाचोरा पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले. परंतु जखमींना त्रास होत असल्याने मुलगा राहुल याची हालचाल होत नसल्याने पोलीसानी उपचाराकरीता मेमो देऊन ग्रामिण रूग्णालय पाचोरा येथे उपचार घेण्यास सांगितले डॉक्टरांनी परिस्थीती पाहून जळगाव येथे जाण्यास सांगितले परंतू जखमींना विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून फिर्यादीच्या डाव्या हातास लोखंडी गज लागून फॅक्चर झाले असुन चेहरावर किरकोळ दुखापत झाली आहे तसेच पत्नी विजयाबाई हिच्या डोक्यावर मधोमध लोखंडी गज मारल्याने गंभीर दखापत झाली असून उपचार सुरू आहेत. सुन पल्लवी हिने व तिच्या वडीलाने लोखंडी गजाने मारहाण केल्याने मुलगा राहुल याच्या चेहऱ्यावर सुध्दा लोखंड गजाने मारहाण करून गंभीररित्या जखमी केले. जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद पाचोरा पोलिसात दाखल करण्यात आल्याने सुन पल्लवी उर्फ कडूबाई व तिचे वडील साहेबराव म्हस्के यांच्या विरोधात कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे करीत आहे.



