आपल खान्देश

पाचोऱ्यात शेतकरी क्रुझरच्या धडकेत ठार! लग्नाचे वऱ्हाड असलेला वाहन चालक क्रझर गाडी घेऊन फरार..


झूम मराठी वृत्तसेवा

पाचोरा-तालुक्यातील पहाण येथील ४६ वर्षीय शेतकऱ्यास भडगाव रोडवरील हाॅटेल भाग्यलक्ष्मी गार्डनजवळ जाधव परीवाराचे लग्नाचे व्हऱ्हाड घेऊन निघालेल्या क्रुझरने धडक दिल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि. १८ जुन रोजी घडली. घटनेप्रकरणी सद्या अज्ञात क्रुझर चालका विरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहाण ता. पाचोरा येथील शेतकरी व पत्रकार संदीप महाजन यांच्या मावसभावाचा मुलगा प्रमोद दत्तु पाटील (वय – ४६) हे आज दि. १८ जुन रोजी सकाळी मोटरसायकलने चाळीसगाव येथे बैलजोडी बघण्यासाठी गेले होते. दरम्यान चाळीसगावहुन पाचोऱ्याकडे येत असतांना हाॅटेल भाग्यलक्ष्मी गार्डन समोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून निघालेल्या पाचोऱ्याकडुन भडगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रुझरने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने प्रमोद पाटील हे खालीपडुन त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. प्रमोद पाटील यांना तात्काळ रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी प्रमोद पाटील यांना मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदन केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात क्रुझर चालका विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मयत प्रमोद पाटील यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक भाऊ, एक मुलगी, एक मुलगा, दोन बहिणी असा परिवार आहे. अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाचे प्रमोद पाटील यांच्या अकस्मात निधनाने पहाण गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे