कुसूंब्यात किरण नाना शिंदे युवा मंच आयोजित मतदार नोंदणी अभियानास नवमतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
कुसुंबा (झूम मराठी) स्वतंत्र दिवसाचे औचित्य साधून कुसुब्यात किरण नाना शिंदे युवा मंच आयोजित मतदार नोंदणी अभियानास नवमतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून नवमतदार नोंदणी शिबिर मोठया उत्साहात संपन्न झाले.
भारत देशाचे स्वतंत्र दिवसाचे औचित्य साधून धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावातील काही नागरिकांना अजून मतदानाचा अधिकार नव्हता तसेच 18 वर्ष पूर्ण झालेले युवक, युवती आणि नवविवाहित दाम्पत्य यांना येणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावत यावा म्हणून आजच्या शिबिरात जागेवरच ऑनलाइन अर्ज भरून नवमतदार नोंदणी शिबिर संपन्न झाले.
यावेळी उपस्थित कुणाल किरण शिंदे, भूषण शिंदे, शशिकांत सैदाने, रोशन शिंदे, तेजस शिंदे, प्रथमेश शिंदे, विपुल शिंदे, मनीष परदेशी, हेमंत बागले, सचिन पाटील, ललित शिंदे, ऋषी शिंदे, ओम शिंदे, मोहन शिंदे, बंटी शिंदे, तुषार शिंदे, प्रतीक बैरागी, लेखराज शिंदे आदी उपस्थित होते.





