Pachora | पाचोऱ्यात ऍसिड हल्ल्याचीं धमकी प्रकरणी संबंधितावर मनसेची कारवाईची मागणी..
पाचोरा येथील अल्पवयीन युवतीवर ऍसिड फेकण्याची धमकी देत विनयभंग केल्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला असून या प्रकरणातील संशयीतांवर कठोर कारवाई व्हावी तसेच पाचोरा शहरातील ठिकठिकाणी रोड रोमीओंचा वाढता उच्छाद आटोक्यात आणण्यास आणावा यासाठी, पाचोरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदन देण्यात आलेल्या असून पाचोरा पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे यांना देण्यात आले आहे,
पाचोरा शहरात रोड रोमियांचा धुमाकुळ जास्त वाढलेला दिसत आहे दिनांक २७/०७/२०२३ रोजी पाचोरा शहरात मध्ये एका तरुणानी माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या अंगावर अॅसिड फेकेल अशी धमकी १४ वर्षीय मुलीला दिली. त्यावर पोलिस प्रशासाने गुन्हा दाखल करून कारवाई देखील करण्यात आली आहे. परंतु पाचोरा शहरा मध्ये शाळा/कॉलेज/क्लासेस साठी पाचोरा तालुक्यातून खूप मुल/मुली शहरात येतात त्यांना देखील ह्यांच्यासारखे रोड रोमियो छेडत असतात पण ते घरी सांगू शकत नाही कारण की त्यांची शाळा / कॉलेज घरचे बंद करतील आणी त्यांचे शिक्षण बंद होईल. मुलगी ही कोणत्याही समाजाची असो हिंदू किवा मुस्लीम समाजाची असो आम्ही जातीय भेदभाव मानत नाही प्रत्येक मुलगी कोणाची तरी बहीण असते त्यांचे स्वरक्षण करते है भावांचे कर्तव्य आहे. पोलिस प्रशासनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेने फॅ विनंती आहे की आपण पाचोरा तालुक्यात एक दामिनी पथक तयार करावे जेणे करून ते पथक सर्व शाळा/कॉलेज ला दोघी वेळी गस्त मारेल व बस स्टैंड परिसरात कायमस्वरूपी एक पोलीस कर्मचारी नेमणूक करावा जेणे करुन रोड रोमियोना पलिस प्रशासनाचा धाक निर्माण होईल व या पुढे अशी काही घटना नाही यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलायला हवी. असे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचोरा स्वतंत्र हेल्प लाईन नंबर सुरू करेल व कोणत्याही बहिणीची तक्रार आल्यास समोरचा कोणत्याही धर्माचा असो से स्टाईल ने चौकात आणून चोप दिला जाईल. अशा अशाचे निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाचोरा तालुकाध्यक्ष शुभम पाटील, पाचोरा शहराध्यक्ष ऋषिकेश भोई, शेतकरी सेनेचे ज्ञानेश्वर ठाकरे, ता.संघटक जितू नाईक, सरचिटणीस – कृष्णा भाऊ दूंदुले, संघटक निलेश मराठे, उपाध्यक्ष यश रोकडे,प्रशांत पाटील, सागर वाघ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



