सार्वजनिक शौचालयासाठी मंजुर असलेल्या जागेत अतिक्रमण करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी हरिभाऊंनी दिला आत्मदहनाचा इशारा..
पाचोरा शहरातील मोंढाळा रोडवरील नगरपालिका हद्दीतील सार्वजनिक शौचालयासाठी मंजुर असलेल्या जागेवर सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करून अतिक्रमण केल्याने सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून कर्मचाऱ्यास सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे अशा आषयाची मागणी येथील बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. सविस्तर माहिती अशी कि,भुसावळ नगर परिषदेतील लेखापाल श्रेणी “अ” चे अधिकारी सुदर्शनराज रमेश शामनानी या सरकारी कर्मचाऱ्याने कर्तुत्व्यात कसुर करून आपल्या पदाचा दुरुपयोग करून पाचोरा शहरातील मोंढाळा रोड परिसरातील सरकारी जागेवरील सार्वजनिक शौचालयाच्या जागेची चोरी करून त्या सरकारी जागेवर स्वतः अतिक्रमण केलेले आहे.
आपल्या लेखापाल श्रेणी “अ” च्या कर्मचाऱ्याने सार्वजनिक शौचालयाच्या सरकारी जागेवर केलेल्या अतिक्रमणाच्या विविध पुराव्यासह लेखी तक्रारी शासनाकडे दाखल केलेल्या आहेत. तरी देखील आपल्या लेखापाल श्रेणी “अ” च्या या कर्मचाऱ्यावर भारतीय संविधानानुसार कोणतीही नियमानुसार कार्यवाही करण्यात आलेली नाही. अतिक्रमण धारक संबधित अधिकारी, सुदर्शनराज रमेश शामनानी यांना सेवेतून कायमचे बडतर्फ तसेच निलंबित करण्यात यावे आणि त्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केले म्हणून शासनाच्या नियमानुसार पोलिसात गुन्हा दाखल करून आपल्या स्तरावरून महाराष्ट्र राज्य शासनाच्या स्व मालकीच्या सरकारी जागेचे रक्षण व्हावे. अन्यथा दिनांक २५ जुलै २०२३ वार मंगळवार पासून अधिवेशन काळात आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती येथील बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. तसेच योग्य न्याय न मिळाल्यास राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आयोजित दौऱ्यात अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकुन आत्मदहनाचा इशारा ही हरिभाऊ पाटील यांनी प्रशासनास दिला आहे. तक्रारी अर्जाच्या प्रति विभागीय आयुक्त (नाशिक), उपविभागीय अधिकारी (पाचोरा), तहसिलदार (पाचोरा), मुख्याधिकारी (पाचोरा), पोलिस निरीक्षक (पाचोरा) यांना देण्यात आल्या आहेत.



