अपघातग्रस्त तरुणांसाठी जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल ठरले देवदूत…
नशिराबाद पुलावर काल रात्री दहा वाजेच्या सुमारास अपघात झाला. यावेळी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या संवदेनशील कृतीमुळे तरुणाचे प्राण वाचले आहेत.अपघातग्रस्त तरुणांसाठी देवदूत – नशिराबाद पुलावर गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास अपघात होऊन अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या तरुणासाठी तेथून जाणारे जिल्हाधिकारी अमन मित्तल देवदूत ठरले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतूक होत आहे. की घटना काय घडली?
रावेरहून पूर परिस्थितीचा पाहणी दौरा आटोपून येत असतांना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना नशिराबाद पुलावर दुचाकीच्या बाजूला अत्यवस्थ अवस्थेत पडलेला तरुण रुपेश कमलाकर सोनवणे (वय-32 रा. प्रिपाळे, जळगाव) दिसला. जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी त्यांचे वाहन थांबवत, त्यांच्या मागून येणाऱ्या वाहतूक पोलीस शाखेच्या इंटर सेप्टर व्हॅनमध्ये तरुणाला तात्काळ भरती केले. जवळचे रुग्णालय असलेल्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीयालय व धर्मादाय रुग्णालयात रुग्णच्या नातेवाईकांशी संपर्क होईपर प्रकृतीची माहिती येईपर्यंत जिल्हाधिकारी रणायान मध्यरात्रीपर्यंत स्वतः थांबून होते.
अपघातात रुपेश सोनवणे ला मेंदूला जबर इजा झाली होती. अपघात झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटाच्या कालावधीतच त्याला दवाखान्यात दाखल केल्यामुळे तरुणाचा जीव वाचला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय वाहिकेची प्रतिक्षा न करता त्यांच्या मागून येणाऱ्या वाहतूक शाखेच्या वाहनात तरुणांला भरती करण्याचा तात्काळ निर्णय घेतला. रुग्णालयात येईपर्यंत दहा मिनिटांच्या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून ठेवला. त्यामुळे तरुणांच्या उपचारांसाठी वैद्यकीय चमू सज्ज होता. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्परतेने केलेल्या मदतीमुळे तरुणांचे प्राण वाचले आहेत. सध्या या तरुणाची प्रकृती स्थिर असल्याची प्रतिक्रिया डॉ. रितेश पाटील यांनी दिली आहे.


