आपल खान्देशब्रेकिंग

आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भडगाव येथील कोविड केअर सेंटर ग्रामिण रूग्णालयाची केली पाहणी..

आमदार किशोर पाटील यांनी तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांची भेट घेतली. काही रूग्ण हे ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यांवर तेथे उपचार सुरू आहेत.

 

 

प्रवीण गढरी -जळगाव जिल्हा प्रतिनिधी 

पाचोरा -नी शासकीय आयटीआय मधील कोविड केअर सेंटर व ग्रामिण रूग्णालयात भेट घेऊन कोरोना रूग्णांची अस्थेवाईक चौकशी केली. त्याच्या समस्या अडचणी समजुन घेऊन संबधित यंत्रणेला तशा सुचना दिल्या. आमदारांच्या या भेटीने रूग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसुन आले.

आमदार किशोर पाटील यांनी तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांची भेट घेतली. काही रूग्ण हे ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यांवर तेथे उपचार सुरू आहेत. तर काही रूग्ण हे शासकीय आयटीआय मधील स्थापन करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मधे क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. त्यांनी दोघं ठीकाणी जाऊन प्रत्यक्ष रूग्णांशी संवाद साधला. त्यांना धीर देत अस्थेवाईक चौकशी केली. त्याच्यां समस्या जाणुन घेतल्या. जेवण , नास्ता वेळेवर मिळतो आहे की नाही याची विचारणा केली. त्याबाबत प्रशासनाला सुचना दिल्या. याशिवाय प्रशासनाच्या ही त्यांनी अडचणी समजुन घेतल्या. यावेळी प्रातांधिकारी राजेंद्र कचरे,नायब तहसिलदार आर.बी.देवकर, वैद्यकीय अधिकारी डाॅ.पंकज जाधव, डाॅ.प्रतिक भोसले आदि उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे